कोंकण सहल परिवारासोबत

 

दिवाळीचा एक महिना अगोदर आमचा परिवाराचे ठरलेले होते की यंदाच्या दिवाळीत आपण कोकण फिरायला जायचे कुठेतरी आमचा प्लॅन निश्चित झाला पण पण आईच्या शाळेच्या रजेचा प्रॉब्लेम प्निर्माण झाला थोडा मूड ऑफ झाला पण नंतर आईला रजा मंजूर झाल्या मग आम्ही पहिले यूट्यूबला बघितले की कोकण मध्ये कुठली स्थळ चांगले आहे मग आम्ही त्यानुसार ट्रिपचा प्लॅन केला व भाऊबीजेच्या संध्याकाळी नाशिक वरून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आम्ही कोल्हापुरात पोचलो कोरोनामुळे निर्बंध असल्याने तिथे देवस्थानाच्या वेबसाइटवरून पास काढावा लागतो पास काढल्यानंतर सुमारे एक तास थांबल्यानंतर आम्हाला दर्शन मिळाले त्यानंतर मंदिर परिसरातच विविध प्रकारच्या बाजारपेठा असल्यामुळे तिथे पारंपरिक पद्धतीची दागिने बघायला मिळाली तसेच कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी मसाला अशा विविध वस्तू मी घेतल्या त्यानंतर आम्ही रंकाळा तलाव कडे रवाना झालो रंकाळा तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे शांतता नि त्या तलावाला अगदी टेन्शन फ्री होतो त्यानंतर तिथून आम्ही निघालो सिंधुदुर्ग गावाकडे जात असताना वाटेतच एक घरगुती खानावळ दिसली व तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो तर कोकण म्हटले की मालवणी मसाला साठी फेमस आहेत तिथे आम्ही जेवण केले आणि आम्ही जिथे रूम बुक केला होता त्या दिशेने रवाना झालो आम्ही संध्याकाळी निवासस्थानी पोहोचलो त्यावेळी आम्ही जेवणानंतर समुद्रकिनार्‍यावर गेलो तिथे गेल्यानंतर तो लाटांचा आवाज अगदी मन प्रसन्न करणारा होता दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही सिंधुदुर्ग वरून बोटीने प्रवास करून समुद्रात असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलो किल्ल्यामध्ये प्रवेश करताच शिवराजेश्वर मंदिराच्या दर्शन घेतले तिने महाराजांच्या काळातील तलवारी व इतर साधने बघायला मिळाली येथे बाजार बैठक भरायच्या ती सुद्धा जागा तिथे बघायला मिळाली.

Comments